नाशिक- मागील काही दिवसांपासून संततधार सुरू असलेल्या जिल्ह्यात मंगळवारी (ता. ८) पावसाचा जोर काहीसा कमी झाला असून, नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र, विविध धरणांमधून विसर्ग सुरूच असून गोदाघाटावरील पूरस्थिती आटोक्यात येत आहे. गंगापूर धरणातून सायंकाळी सहा वाजता ३९६९ क्यूसेक इतका विसर्ग करण्यात आला आहे. परिणामी गेल्या चार दिवसांपासून पाण्याखाली गेलेला गोदाघाट काहीसा सावरला आहे.