पंचवटी: गेल्या दोन दिवसांपासून नाशिकसह गंगापूर धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, गोदावरी नदीच्या पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या वाढली आहे. पंचवटीतील रामतीर्थ घाट परिसरात याचदरम्यान चक्रधर स्वामी मंदिरासमोर पार्किंगमध्ये उभी असलेली होंडा सिटी कार पाण्यात अडकून पडली होती. वाहून जाण्याचा धोका निर्माण झाल्याने अग्निशमन दलाने तत्काळ पावले उचलून हे वाहन सुरक्षित बाहेर काढले.