पंचवटी- गोदा नदीपात्रात कपडे धुण्यास मनाई असतानाही ती झुगारून सर्रास कपडे धुण्यात येत असल्याने गोदाकाठ हा जणू काही धोबीघाट झाला असल्याचे दिसत आहे. .पंचवटी परिसरातील रामतीर्थ, गांधीतलाव, गौरीपटांगण भागात दररोज मोठ्या संख्येने भाविक हे देवदर्शनासाठी येत असतात. गोदापात्रात प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी उच्च न्यायालयाने महापालिका प्रशासनाला बजावले असतानाही गोदापात्रात काही नागरिकांकडून सर्रास कपडे आणि वाहने धुतली जात आहे. .यांना विरोध केला असता त्यास कोणीही जुमानत नाही. कारवाई केल्यानंतर हा प्रकार तात्पुरता बंद होतो. मात्र अधिकारी, कर्मचारी यांची पाठ फिरताच पुन्हा परिस्थिती जैसे थे होते. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत कपडे धुण्यासाठी गोदाघाटावर गर्दी झालेली दिसते. धुतलेले कपडे गोदाघाटावर वाळत टाकले जात असल्यामुळे हा गोदाघाट जणू काही धोबी घाट बनला आहे..गोदापात्रातील पाणी प्रदुषित होऊ नये, यासाठी गोदा संर्वधन कक्षाची स्थापना करण्यात आलेली होती. या कक्षाच्या सुरवातीच्या काळातील कामकाज चांगल्या प्रकारे झाल्यामुळे गोदापात्र खुलून दिसत होते. कालांतराने हा कक्ष बंद पडला. येथील सुरक्षारक्षकही गेले त्यामुळे पुन्हा गोदाघाटाला अवकळा आल्याचे चित्र तयार झाले. आता वाहत्या पाण्यात महापालिकेच्या सुरक्षा रक्षकांच्या समोर कपडे धुण्यात येत असताना त्यांना रोखण्यात या कर्मचाऱ्यांना अपयश येत असल्यामुळे गोदावरीचे प्रदूषण थांबलेले नाही..अनेक ठिकाणी अस्वच्छतासांडव्या देवीजवळील पात्रात निर्माल्य साचलेले असून, घातक प्लॅस्टिक पाण्यात दिसून येते. वेळोवेळी जनजागृती करूनही नागरिकांकडून निर्माल्य, प्लॅस्टिक टाकले जात असल्याचे आढळून येते. .तुटपुंजे सुरक्षारक्षकगोदाघाटलगत आजूबाजूच्या परिसरातील नागरिक व भक्त भाविक कपडे धुवत असतात. यांच्यावर निर्बंध लावण्यासाठी महापालिकेने आठ सुरक्षारक्षक नेमले आहेत. यात पाच महिला, तीन पुरुष आहेत. पाच महिला व दोन पुरुष सुरक्षारक्षक सकाळी सात ते तीन ड्यूटीवर असतात. तर एक सुरक्षा रक्षक हा सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजे पर्यंत कर्तव्य बजावत असतो. हे सुरक्षारक्षक हे कपडे धुणाऱ्यांवर कारवाई करतात. यात दंडाचे प्रावधान आहे. गोदाघाट परिसर बघता सुरक्षा रक्षकांची संख्या तुटपुंजी असल्याने तसेच अनेकदा या सुरक्षारक्षकांकडे देखील दुर्लक्ष केले जाते..नियमाचे सर्रास उल्लंघनउच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गोदावरी नदीपात्र प्रदूषित करणे, धुणेभांडी करणे, निर्माल्य व केरकचरा टाकणे यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे. जर असे कोणी करताना आढळून आल्यास त्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा असे निर्देशित करण्यात आले असताना देखील असे प्रकार सर्रासपणे सुरु आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.