नाशिक- गोदावरी नदीत प्रदूषित पाणी येत आहे, ही वस्तुस्थिती आहे. पण, गोदावरीचे पाणी शुद्धीकरणासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जलसंपदा तथा कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. कुंभमेळा स्नानाला शेकडो वर्षांची परंपरा आहे, एकाच वेळी लाखो भाविकांनी स्नान केल्याने पाणी प्रदूषित होते, असे मानण्याचे कारण नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे मत वेगळे असू शकते, असा टोलाही महाजन यांनी लगावला.