नाशिक- शहरातून वाहणाऱ्या गोदावरीसह नंदिनी, वालदेवी नद्यांच्या पाण्याचा बायो ऑक्सिजन डिमांड (बीओडी) दहा मिलिग्रॅम प्रतिलिटर असणे आवश्यक असताना मर्यादेपेक्षा अधिक बीओडी आढळून आल्याने ध्वनीपाठोपाठ जलप्रदूषणाने पातळी ओलांडल्याचे स्पष्ट झाले आहे. चिखली नाला १५, चरण कॉलनी ३.८, चोपडा १५.३, मल्हारखान १५.३ तर जोशीवाडा २०, सरस्वती नाला १८, नागझरी नाला १६.८, अरुणा नदीचा नाल्याचा बीओडी १३.८ आहे. सर्व नाले नदीपात्रात सोडण्यात आल्याने नद्या प्रदूषित झाल्या आहेत.