नाशिक रोड- गोदावरी नदी प्रदूषण रोखण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी तातडीने आणि प्रभावीपणे कार्यवाही करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी दिले. नदीपात्रातील अतिक्रमण रोखणे आणि सांडपाणी थांबवण्यासाठी ठोस उपाययोजनांना गती देण्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.