गोदावरी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचा डंका इंग्लंडमध्ये!

godavari river
godavari riveresakal
Updated on

पंचवटी (नाशिक) : काँक्रिटचा थर काढल्यावर नैसर्गिकरीत्या प्रवाहित झालेल्या गोदावरीची व लढ्याची यशोगाथा लंडनच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात दाखविण्यात आली आहे. त्यामुळे मूळ नाशिककर असलेल्या सामाजिक कार्यकर्त्याने दिलेला लढा नाशिककरांसाठी अभिमानस्पद ठरला आहे. सिंहस्थापूर्वी गोदावरी नदीपात्रात टाकलेला काँक्रिटच्या थराचा व त्याविरोधात राज्य पातळीवर लढा उभारणारे सामाजिक कार्यकर्ते देवांग जानी यांच्या नावाचा डंका आता जागतिक पातळीवर पोचला आहे. (Godavari-river-revival-project-appreciated-in-England-nashik-marathi-news)

उपक्रमाची आंतरराष्ट्रीय दखल

सर जॉन सोरेल व आणि बेनेई लान्स यांनी पाच वर्षांपूर्वी म्हणजे २०१६ मध्ये लंडनमध्ये डिझाइन बिनाले या प्रदर्शनाचा आरंभ करत आंतरराष्ट्रीय पातळीवर डिझाइनच्या माध्यमातून विविध प्रश्‍नांची उत्तरे शोधण्यासाठी व्यासपीठाची निर्मिती केली. या वर्षी १० जूनपासून हे प्रदर्शन सुरू झाले असून, ते २७ जूनपर्यंत सुरू राहणार आहे. ‘रेझोनन्स अनुवाद’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनासाठी जगभरातील अशा कल्पनांना व प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे, की ज्यामुळे मूलभूत बदलाबरोबरच अनेक प्रश्‍नांची उत्तरे मिळतील. प्रकल्पासाठी जगभरातील दहा देशांतून पर्यावरणस्नेही कामांची माहिती मागविण्यात आली होती. भारतातील अशा कामांची निवड करण्याची जबाबदारी बेंगळुरूस्थित आर्किटेक्ट निशा मॅथ्थू-घोष यांनी उचलली होती. यात ‘स्मॉल इज ब्यूटिफूल’ तत्त्वावर आधारित शुद्ध पाणी, हवा, ऊर्जा व वने या क्षेत्रातील तब्बल १५९ प्रकल्पांची निवड करण्यात आली होती. त्यात शुद्ध पाणी या प्रकारात गोदापात्रातील काँक्रिटचा थर काढून जिवंत जलस्रोतांचे पुनरुज्जीवन या प्रकल्पाचाही समावेश करण्यात आला होता.

दीर्घ लढ्याला यश : जानी

नदीपात्रातील काँक्रिटीकरण काढण्यासाठी देवांग जानी सात वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांच्या लढ्याची आता आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेण्यात आली असून, हे श्री. जानी यांच्या लढ्याचे यश असल्याचे भूजल पुनरुज्जीवन संशोधक डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी सांगितले. नदीपात्रातील पाच कुंडांमधील काँक्रिटीकरण काढल्यावर जिवंत जलस्रोत पुन्हा जिवंत होऊन त्यातून मुबलक पाणी उपलब्ध होत असल्याने पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने आपल्या दीर्घकालीन लढ्याचे हे यश असल्याचे श्री. जानी यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. हा लढा यापुढेही सुरू ठेवण्याचा निर्धारही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

godavari river
जिल्ह्यात मराठी शाळांना मिळतेय पसंती; पटसंख्येत दुपटीने वाढ
godavari river
जनतेसाठी गुंड झाल्याचा अभिमानच - सुधाकर बडगुजर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com