Godavari River : गोदावरी पाणीवाटपाचा वाद मिटणार? प्राधिकरणाने मराठीत अहवाल प्रसिद्ध केला

Background of the Godavari Water Dispute : नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यातून वाहणारी गोदावरी नदी. या नदीच्या पाणीवाटपावरून सुरू असलेल्या जुन्या वादावर महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (MWRRA) नवीन अहवाल सादर केला आहे, ज्यामुळे या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Godavari River
Godavari Riversakal
Updated on

निखिल रोकडे- नाशिक: गेल्या दीड दशकापासून नाशिक- अहिल्यानगर व मराठवाडा भागात गोदावरी नदीच्या पाणीवाटपावरून सुरू असलेल्या संघर्षावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने (एमडब्ल्यूआरआरए) समन्यायी पाणीवाटपाचा नवा अहवाल आता मराठी भाषेत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. या अहवालावर नागरिक व शेतकऱ्यांनी अभिप्राय व हरकती एका महिन्याच्या आत नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर प्राधिकरण अंतिम निर्णय घेणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com