अखेर गोदावरी खळाळणार

अखेर गोदावरी खळाळणार
Published on: 
अखेर गोदावरी खळाळणार गंगापूरमधून एकलहरेसाठी आवर्तन सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २९ : एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि आजूबाजूच्या गावांसाठी गंगापूर धरणातून २५ दलघफु पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी (ता.३१) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याला गोदावरी नदी खळाळणार आहे. पंचवटीतील रामतीर्थ परिसरात सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्याची कामे अंतिम टप्यात आली आहे. पण, या कामानिमित्ताने गेल्या काही दिवसांपासून रामतीर्थ व गांधी तलाव कोरडाठाक करण्यात आला आहे. त्यामुळे अगोदरच दुष्काळी परिस्थिती त्यात ध्वजारोहणाला पाणी कोठून आणणार असा प्रश्‍न निर्माण झाला होता. मात्र, एकलहरे केंद्र तसेच आजूबाजूची गावे आणि नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यातील पक्ष्यांचा अधिवास धोका लक्षात घेता पाण्याची मागणी होत आहे. या मागणीच्या आधारे गंगापूर धरणातून २५ दलघफु पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुुरुवारी (ता.२९) मध्यरात्रीपासून ३०० क्युसेक वेगाने गंगापूर धरणातून विसर्ग सुटणार सुरु करण्यात आला. त्यामुळे ध्वजारोहणाच्या दिवशी गोदामाई खळाळणार आहे. --- कोणत्याही धार्मिक सोहळ्यासाठी पाणी सोडण्याबाबत धोरण नाही. गंगापूर धरणातून सोडण्यात येणारे पाणी हे गावे, एकलहरे केंद्र व जनावरांचा विचार करून सोडले जात आहे. या आवर्तनासाठी वारंवार मागणी होत होती. त्यामुळे कुंभमेळ्याशी त्याचा संदर्भ जोडू नये. नाशिक शहरात तूर्तास पाणी कपात लागू केलेली नाही. नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा. -गिरीश महाजन, पालकमंत्री.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.