फोटो -NSK26H35035
नाशिक : गोदावरी अर्बन बँकेच्या संचालकपदी निवड झालेल्या नीलिमा पवार, ज्ञानेश्वर भोसले, अशोक मोगल पाटील आणि चेतन कारे यांच्यासह अध्यक्षा अमृता पवार, उपाध्यक्ष वसंतराव खैरनार आदी.
गोदावरी अर्बन बँकेच्या
संचालकपदी चौघांची निवड
-----------------------
पवार, भोसले, पाटील, कारेंचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. १४ : गोदावरी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., नाशिकच्या संचालक मंडळातील रिक्त झालेल्या जागांसाठी चार संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यासी अधिकारी तथा सहायक निबंधक स्वप्निल मोरे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १३) बँकेच्या मुख्य कार्यालयात ही प्रक्रिया पार पडली.
या निवड प्रक्रियेत संचालक पदावर नीलिमा पवार, ज्ञानेश्वर भोसले, अशोक मोगल पाटील आणि चेतन कारे यांची बिनविरोध निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी मोरे यांनी जाहीर केले. या प्रसंगी बँकेच्या अध्यक्षा आर्कि. अमृता पवार, उपाध्यक्ष वसंतराव खैरनार, संचालक सुरेश पाटील, दत्तात्रय पिंगळे, डॉ. तानाजी कानडे, मनोहर देवरे, अनिल भालेराव, रावसाहेब कोशिरे, विवेक तांबे, अनिता भामरे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश गव्हाणे आदी उपस्थित होते. निवडीनंतर नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार करण्यात आला.