गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू

गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावरून पडून तरुणाचा मृत्यू
Published on: 
NSK26H35193 : जळगाव : घटनास्थळी जमलेली बघ्यांची गर्दी. NSK26H35195 : गोलाणी संकुलाच्या चौथ्या मजल्यावर पडलेली चप्पल. ----- ‘गोलाणी’च्या चौथ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. १७ : शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी संकुलाच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका ४२ वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (ता. १७) दुपारी दोनच्या सुमारास घडली. मृत व्यक्तीची ओळख उशिरापर्यंत पटलेली नसून, पोलिसांकडून त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. गोलाणी संकुलात सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे व्यापारी आणि नागरिकांची वर्दळ सुरू होती. याचदरम्यान चौथ्या मजल्यावरून एक तरुण खाली पडल्याची घटना घडली. जमिनीवर आदळल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे संकुल परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच व्यापारी आणि नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जळगाव शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरुणाला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. चौकट पोलिसांकडून ‘सीसीटीव्ही’ची तपासणी मृत तरुणाची ओळख पटलेली नसल्याने पोलिसांकडून त्याचे नाव व पत्ता शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. तरुणाचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला, याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिस कर्मचारी सतीश पाटील, वीरेंद्र शिंदे, नंदू पाटील आणि राहुल पांचाळ यांनी घटनास्थळी पाहणी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.