सोग्रस : मोटारसायकलवर आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ७४५०० रुपये किमतीची अडीच तोळे वजनाची सोन्याची पोत लांबविली. हा प्रकार लासलगाव- मनमाड रोडवरील काळखोडे फाटा (ता.चांदवड) गतिरोधकावर सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडला. .या घटनेबाबत वाहेगाव साळ येथील शांताबाई मच्छिंद्र न्याहारकर (वय ४२) यांनी चांदवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शांताबाई या काळखोडे फाट्यावरून जात असताना मोटरसायकलवरून आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्या चोरट्याने अचानक शांताबाई यांच्या गळ्यातील ७४ हजार पाचशे रुपये किमतीची अडीच डोळे वजनाची सोन्याची पोत जबरीने हिसकावून घेऊन पलायन केले. .'केंद्राने पाकिस्तानवर निर्बंध लादले, पण ते लादताना सरकारने थोडा विचार केला पाहिजे'; असं का म्हणाले शरद पवार?.दोघे अनोळखी चोरटे ३० ते ३२ वयोगटातील असून त्यांचे तोंड बांधलेले होते. त्यांच्या अंगात काळ्या रंगाचा शर्ट होता. या प्रकरणी चांदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.