Latest Crime News | शहरात सोनसाखळी चोर मोकाट; 16 दिवसातील जबरी चोरीची 13वी घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chain Snatching Crime News

Chain Snatching : शहरात सोनसाखळी चोर मोकाट; 16 दिवसातील जबरी चोरीची 13वी घटना

नाशिक : खुडवटनगर परिसरात रात्री शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोरट्याचे हिसकावून नेल्याची घटना घडली. गेल्या १६ दिवसातील जबरी चोरीची ही १३ वी घटना आहे. तर, यामध्ये महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचून नेल्याच्या १० घटना घडल्या आहेत.

ऐन सणासुदीमध्ये महिलांच्या सोनसाखळ्या खेचून नेल्या जात असताना, त्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कडेकोट नाकाबंदीचा केलेला दावा मात्र फोल ठरतो आहे. या वाढत्या घटनांमुळे महिलांची सुरक्षितता धोक्यात तर आलेली असतानाच पोलिसांविषयी रोषही वाढला आहे. (gold chain theft increased in city 13th incident of theft in 16 days Nashik Latest Crime News)

पुष्पा राजेंद्र देवरे (रा. वृंदावननगर, खुटवडनगर) यांच्या फिर्यादीनुसार, शनिवारी (ता.१५) रात्री त्या बहिणीसमवेत शतपावलीसाठी घराबाहेर पडल्या. या वेळी कान्होळे नाल्यावरील पुलावर त्या असताना पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा मोपेडवरून आलेल्या संशयिताने त्यांच्या गळ्यातील ४० हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून पोबारा केला. याप्रकरणी मध्यरात्री अंबड पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक पोलिस निरीक्षक खतेले हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार पोलिस ठाणेनिहाय सकाळ-सायंकाळ नाकाबंदी करण्यात येत असतानाही सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा बसू शकलेला नाही. शहरात मोकाट फिरत असलेल्या सोनसाखळी चोरट्यांमुळे महिलांमध्ये मात्र दहशतीचे वातावरण आहे.

हेही वाचा: Nashik Crime News : Forex Tradingद्वारे तरुणाला तब्बल साडेआठ लाखांचा गंडा!

१६ दिवसांतील जबरी चोरीच्या घटना :

घटनेची तारीख.... हद्द/पोलिस ठाणे .... गेलेला ऐवज (किंमत)
३० सप्टेंबर : कोणार्कनगर, आडगाव : १५,५०० सोन्याची पोत
३ ऑक्टोबर : गांधीनगर, उपनगर : १,८०००० सोन्याची पोत
१० ऑक्टोबर : बळी मंदिर, पंचवटी : २५,००० सोन्याची पोत
११ ऑक्टोबर : बोराडे मळा, म्हसरुळ : २०,००० सोन्याची पोत
१२ ऑक्टोबर : हनुमान वाडी, पंचवटी : ९०,००० सोन्याची पोत
१२ ऑक्टोबर : इंदिरानगर : ६०,००० सोन्याची पोत
११ ऑक्टोबर : अशोका मार्ग, मुंबई नाका : १२,००० मोबाईल
११ ऑक्टोबर : महाले फार्म, अंबड : १०,५०० मोबाईल
१२ ऑक्टोबर : इंदिरानगर : ६०,००० सोन्याची पोत
१३ ऑक्टोबर : जाणता राजा कॉलनी, पंचवटी : ४५,००० सोन्याची पोत
१५ ऑक्टोबर : पुणे महामार्ग, उपनगर : ९०,००० राणीहार (घटना सप्टेंबरमधील)
१६ ऑक्टोबर : वृंदावननगर, अंबड : ४०,००० सोन्याची पोत

हेही वाचा: Nashik Crime : 2 ठिकाणी दरोडा; मारहाण, रोकडसह 3 लाख 38 हजारांचा मुद्देमाल लांबविला