Nashik Crime: भद्रकाली पोलिसांकडून 3 दिवसांत सोनसाखळी चोरांना अटक

भद्रकाली गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत अवघ्या तीन दिवसांत दोन साखळीचोरांनी अटक केली
Two gold chain thieves arrested, police officers, employees along with the items seized from them
Two gold chain thieves arrested, police officers, employees along with the items seized from themesakal
Updated on

जुने नाशिक : भद्रकाली गुन्हे शोध पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत अवघ्या तीन दिवसांत दोन साखळीचोरांनी अटक केली.

चौकशीत दोन गुन्हे उघडकीस आले. त्यांच्याकडून तीन लाख १८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. (Gold chain thieves arrested by Bhadrakali police in 3 days Nashik Crime)

द्वारका चौकात गुरुवारी (ता. ४) चारचाकी गाडीत बसलेल्या महिलेची सोनसाखळी ओरबाडण्याचा प्रकार घडला होता. महिलेच्या तक्रारीवरून भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे शोध पथक संशयितांच्या मागावर होते. द्वारका परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. त्यात दोन जण सोनसाखळी ओरबाडताना दिसून आले. त्याआधारे पथकाने त्यांचा शोध घेतला.

दोघेही संशयित विडी कामगारनगर, पंचवटी भागात राहात असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यवान पवार, सतीश साळुंके, अविनाश जुंद्रे, नितीन भामरे, धनंजय हासे, नीलेश विखे, सागर निकुंभ, दयानंद सोनवणे, नारायण गवळी यांनी संपूर्ण भागाची चाचपणी केली.

Two gold chain thieves arrested, police officers, employees along with the items seized from them
Sambhaji Nagar Crime : हर्सूल शिवारातील टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला

रविवारी (ता. ७) संशयित ओंकार उर्फ दीपक वसंत शिंदे (वय २३), रोशन सुधाकर कटारे (वय २३, दोघे रा. विडी कामगारनगर, पंचवटी) यांना ताब्यात घेतले. दोन दिवस त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी (एमएच १५, जीटी ९०५८), दोन सोनसाखळ्या असे सुमारे तीन लाख १८ हजारांचा ऐवज जप्त केला.

Two gold chain thieves arrested, police officers, employees along with the items seized from them
Akola Crime News : माझं काय चुकलं, मला न्याय मिळेल का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com