Akshay Tritiya : मुद्रणालयातर्फे सोन्या-चांदीची नाणी सर्वांसाठी उपलब्ध

Gold Silver Coins & Bars
Gold Silver Coins & Barsesakal

Akshay Tritiya : अक्षय तृतीयानिमित्त प्रेस महामंडळाने नाशिक रोडच्या भारत प्रतिभूती वह चलार्थपत्र मुद्रणालय कामगारांबरोबरच नागरिकांसाठी शुद्ध सोन्या-चांदीची नाणी (मुद्रा) विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत.

विशेष म्हणजे ही नाणी प्रेस महामंडळाच्या टांकसाळेत तयार करण्यात आलेली आहेत. इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे आणि कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी ही माहिती दिली. (Gold Silver Coins available to all by Press corporation occasion Akshaya Tritiya nashik news)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Gold Silver Coins & Bars
MSRTC Smart Card: ठेका संपल्याने कामकाज Offline; राज्यात सवलत योजनांसाठीचे स्मार्टकार्ड झाले शोपीस!

जेलरोडवरील चलार्थ पत्र मुद्रणालय समोरील काचेच्या इमारतीत २० ते २६ एप्रिलदरम्यान ही नाणी विक्रीसाठी उपलब्ध राहतील. या नाण्यांच्या घोषित किमतीत सर्व कर समाविष्ट आहेत. आगाऊ नाव नोंदणीसाठी आयएसपी एचआर विभागात संपर्क साधावा किंवा सहाय्यक व्यवस्थापक किशोर माने (९९८१९४४४३३) यांच्याशी संपर्क साधावा.

पाच ते दहा ग्रॅमपर्यंत सोन्याची नाणी व सोन्याचा वीस ग्रॅमचा बार तसेच चांदीची चाळीस ग्रॅमची नाणी उपलब्ध आहेत. सोन्याच्या पाच ग्रॅमच्या नाण्याची किंमत ३२,७८६ आहे. चांदीच्या ४० ग्रॅमच्या नाण्याची किंमत ३३६७ आहे.

भगवान गणेश, महालक्ष्मी, दुर्गामाता, अक्षयतृतीया मुद्रा, मोर चित्र रचना मुद्रा, लक्ष्मी व गणेश मुद्रा अशा स्वरूपात ही नाणी तयार करण्यात आली आहेत. प्रेस कामगार व नागरिकांनी आगाऊ नावनोंदणी करूनही ही नाणी खरेदी करावीत, असे आवाहन जगदीश गोडसे यांनी केले आहे.

Gold Silver Coins & Bars
Nashik News : दुसऱ्यास ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; सिडको कार्यालयात मुदतबाह्य अग्निशमन सिलिंडर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com