नाशिक: स्वातंत्र्यदिनी नाशिक जिल्ह्यात ध्वजारोहणाचा मान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी गोंदिया जिल्ह्यातील ध्वजारोहणास नकार दिला आहे. यामुळे पालकमंत्रिपदावरून महायुतीत निर्माण झालेला वाद विकोपाला पोहोचला आहे. छगन भुजबळ यांच्या नकारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोंदियातील ध्वजारोहणाची जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याकडे दिली.