नाशिक- जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठेत हा सप्ताह सामान्य राहिला. कुठल्याही वस्तूच्या भावात तेजी-मंदी दिसून आली नाही. यंदाच्या हंगामामध्ये मिरचीच्या आणि नवीन डाळींच्या दराबाबत गृहिणींसाठी मात्र दिलासा मिळाला आहे. मिरचीच्या दरात २५ ते ४० टक्क्यांनी घसरण झालेली आहे.