‘दिवटी दिवाळी अंक खानदेशाचे वैभव

‘दिवटी दिवाळी अंक खानदेशाचे वैभव
Published on: 
दोन कॉलम बातमी NSK26H34651 जळगाव : कवी गोपीचंद धनगर यांच्या ‘दिवटी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक व चित्रकार राजू बाविस्कर, कवी अशोक कोतवाल आदी मान्यवर. ------------------- कवी गोपीचंद धनगर यांच्या ‘दिवटी’ अंकाचे प्रकाशन सकाळ वृत्तसेवा जळगाव, ता. ६ : येथील कवी व लेखक प्रा. गोपीचंद धनगर यांच्या ‘दिवटी’ या दिवाळी अंकाचे प्रकाशन शहरातील काव्यरत्नावली चौकात साहित्य, सांस्कृतिक व शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता.६) झाले. पार पडला. या अंकात कविता, कथा, विशेष लेख, ललित लेख व कादंबरी या प्रकारांतील महाराष्ट्रातील ५८ नामवंत साहित्यिकांच्या साहित्याचा समावेश आहे. या अंकाच्या प्रकाशनप्रसंगी साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक व चित्रकार राजू बाविस्कर, सुप्रसिद्ध साहित्यिक कवी अशोक कोतवाल, कवी जितेंद्र कुवर, अथर्व पब्लिकेशन्सचे संगीता माळी, विजय जैन, समीक्षक डॉ. रमेश माने, कवी-कथाकार जगदीश पाटील, उर्दू भाषेतील साहित्यिक मोइनुद्दीन उस्मानी, प्रभात चौधरी, ज्येष्ठ पत्रकार शेखर पाटील, प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, डॉ. साहेबराव भुकन, उपप्राचार्य डॉ. सत्यजित साळवे, सिने-नाट्य कलावंत हर्षल पाटील, प्रा. युनूस शेख, डॉ. मिलिंद बागुल, बाबुराव पानपाटील, सुनील सोनवणे, वसंत गवई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ‘दिवटी’ अंकाचे स्वागत केले. या अंकामुळे खानदेशच्या वाड्मयीन व सांस्कृतिक वैभवात वैभवात भर पडल्याचे नमूद केले. सूत्रसंचालन डॉ. सत्यजित साळवे यांनी केले. प्रा. धनगर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी डॉ. नीलेश चौधरी, डॉ. ज्ञानोबा सोनटक्के, डॉ. शांताराम तायडे यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.