फोटो २ कॉ
GHT26B05365
नाशिक : ‘जल्लोष २०२६’ मध्ये गोवर्धने महाविद्यालयाचे पारितोषिक स्वीकारताना डॉ. कल्पना वाजे आणि विजेते विद्यार्थी.
------------------
३०-२
गोवर्धने महाविद्यालयाला
‘जल्लोष’चे उपविजेतेपद
सांस्कृतिक विभागाची दहा वर्षांची स्वप्नपूर्ती
सकाळ वृत्तसेवा
घोटी, ता.१ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ आणि भुजबळ ज्ञाननगरीतर्फे झालेल्या ‘जल्लोष २०२६’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवात इगतपुरी येथील कर्मवीर पुंजाबाबा गोवर्धने महाविद्यालयाने अष्टपैलू कामगिरी करत सर्वसाधारण उपविजेतेपदाचा बहुमान पटकावला.
----------
विविध कला, नृत्य आणि सांस्कृतिक स्पर्धांमध्ये गोवर्धने महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांचे प्रभावी सादरीकरण केले. विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत विद्यार्थ्यांनी विजेतेपदाची पारितोषिके मिळवली. या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या दहा वर्षांपासूनच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
प्राचार्य डॉ. किरण रकीबे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. कल्पना वाजे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण सराव, नियोजन आणि शिस्तबद्ध तयारी केली. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने त्यांनी रंगमंचावर उत्कृष्ट सादरीकरण केले. या यशाबद्दल मविप्र सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, तालुका संचालक अॅड. संदीप गुळवे तसेच पदाधिकाऱ्यांनी प्राचार्य, सांस्कृतिक विभाग प्रमुख आणि विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
-----------------