नाशिक- शासकीय आश्रमशाळांतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृहे उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे. नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये एकूण १० वसतिगृहांच्या उभारणीसाठी ६६ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रत्येक वसतिगृहासाठी ६ कोटी ६७ लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.