जुने नाशिक - मालेगाव बनावट दाखले प्रकरणानंतर जन्म-मृत्यू दाखले, ना हरकत प्रमाणपत्र देण्यासह उशिराने अर्ज करणाऱ्यांना चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत दाखले देणे बंद करण्यात आले होते. बुधवारी (ता. १२ मार्च) सरकारतर्फे नवीन शासकीय परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले. विविध अटी-शर्ती आणि कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर संबंधित विभागांना जन्म-मृत्यू दाखले वितरण करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. त्यामुळे उशिराने अर्ज करणाऱ्याला दाखला देण्यासह ना हरकत प्रमाणपत्र वितरणाचा मार्ग सुमारे दोन महिन्यांनी खुला झाला आहे.