Medical Facilities: सरकारी वैद्यकीय सुविधा आता निःशुल्क! सर्व शासकीय रुग्णालयांत उद्यापासून अंमलबजावणी

Medical Facilities
Medical Facilitiesesakal

Medical Facilities : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांना पुरविण्यात येत असलेल्या वैद्यकीय सेवा, तपासणी व त्याबाबतचे शुल्क निश्चित करण्यात आले होते.

आगामी काळात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयांत रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणीसाठी शुल्क द्यावे लागणार नाही.

रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या १५ ऑगस्टपासून करण्यात येईल. त्यामुळे राज्यातील गरीब, आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना नि:शुल्क उपचार मिळणार आहेत. (Government medical facilities now free Implementation from tomorrow in all government hospitals Nashik)

सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने निर्णय घेतला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकास जगण्याचा अधिकार हा मूलभूत हक्क म्हणून प्रदान करण्यात आला.

प्रत्येक नागरिकास चांगल्या आरोग्यासाठी उपचार मिळाले पाहिजेत. राज्यातील प्रत्येक नागरिकास नि:शुल्क, दर्जेदार, सहज व विनाविलंब वैद्यकीय सेवा देण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे.

त्यानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयांतून नि:शुल्क उपचाराचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यातील नागरिकांना उत्तमरीत्या आरोग्य हक्क देण्याकरिता आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांमध्ये संसाधने, साधनसामग्री, प्रशिक्षित मनुष्यबळ, औषधांची उपलब्धता, आरोग्यविषयक जनजागृती, लसीकरण, औषधोपचार असे अनेक घटक असून, रुग्णशुल्काचा यात समावेश होतो.

सद्यस्थितीत आरोग्य संस्थांमधील औषधे व उपचारांवरील शुल्क नि:शुल्क होणार असल्याने सर्व वंचित, दुर्बल घटकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Medical Facilities
Jalgaon News: कनिष्ठ महाविद्यालयांची कला शाखा सलाईनवर! विद्यार्थीसंख्येचा नियम बदलण्याची गरज

रक्त, रक्तघटकांसाठीच शुल्क

शासनाकडून जनतेसाठी आयुष्मान भारत योजना व महात्मा फुले जनआरोग्य योजना यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहेत.

या योजनांतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य खर्चाची हमी शासनाने यापूर्वीच घेतली. या योजनांमधून राज्यातील सर्व नागरिकांना आरोग्य खर्चाचे कवच शासनाने उपलब्ध करून दिले आहे.

राष्ट्रीय रक्त धोरणानुसार रक्त व रक्तघटक पुरवठा यासाठी आकारण्यात येणारे सेवाशुल्क वगळून शासकीय रुग्णालयांमधून करण्यात येणाऱ्या तपासण्या व उपचार तसेच सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील वैद्यकीय सेवा नि:शुल्क करण्यात येईल.

Medical Facilities
Dhule News: भाडेनिश्‍चितीअभावी उत्पन्नावर पाणी! BOT शॉपिंग कॉम्प्लेक्सचा प्रश्‍न

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com