नाशिक- पुढील तीन दिवस शासकीय सुटी जाहीर करण्यात आली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र सर्वच सरकारी कार्यालये सुरू ठेवण्याच्या सूचना आहेत. महापालिकेचे नगररचना, कर विभाग, लेखा विभाग तर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद तसेच कोशागार कार्यालयेदेखील सुटीचे तीन दिवस सुरू राहणार आहेत. मुद्रांक कार्यालये तसेच हिशोब अंतिम करण्यासाठी बँकादेखील सुरु राहणार आहे.