पान-२ सेकंडे मेन
नाव-दुरुस्ती, बदलासह विविध कामे रखडली
-----------
आपलं सरकार पोर्टलला सर्व्हर डाऊनचा फटका ः प्रशासनाचे दुर्लक्ष, उपाययोजनेची मागणी
------------
सकाळ वृत्तसेवा
घोटी, ता.२२ ः आपले सरकार पोर्टलचे सर्व्हर वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. १६ आॅक्टोबरपासून सर्व्हर डाऊन असल्याने विविध शासकीय कामे रखडली आहेत. विशेष म्हणजे, नावात बदल आणि आडनावात दुरुस्ती करण्याची सेवाही मागील दोन महिन्यांपासून बंद असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
विविध शासकीय दाखले, शिधापत्रिका, प्रतिज्ञापत्रे (ॲफिडेव्हिट) आणि इतर महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी नागरिक सेतू व आपले सरकार केंद्रांवर चकरा मारत आहेत. मात्र, सर्व्हर काही काळ सुरू होतो आणि पुन्हा बंद पडतो. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाया जात असून, विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांची कामे खोळंबली आहेत.
१६-१
‘सर्व्हर अपग्रेड सुरू आहे’
नागरिकांनी ई- मेल आणि टोल फ्री क्रमांकावर तक्रारी करूनही ‘सर्व्हर अपग्रेडचे काम सुरू आहे’ असे उत्तर मिळत असल्याचे सांगितले जाते. अपग्रेडसाठी नेमका किती कालावधी लागणार, याबाबत स्पष्ट माहिती मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. सुट्ट्यांमध्ये कामकाज होत नसेल आणि कामकाजाच्या दिवशीही सेवा बंद राहत असेल, तर नागरिकांनी शासकीय कामे पूर्ण कशी करावीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
१६-१
सेतू चालकांवरच रोष व्यक्त
सर्व्हर बंद असल्यामुळे सेतू केंद्र चालकांनाही नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. अर्जांची प्रक्रिया पूर्ण होत नसल्याने नागरिक आणि केंद्र चालकांमध्ये वादावादीचे प्रसंग निर्माण होत आहेत. मात्र, या समस्येवर प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. प्रशासनाने सर्व्हर बंद पडण्याचे कारण स्पष्ट करून सेवा पूर्ववत होण्याची निश्चित वेळ जाहीर करावी. पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देत तांत्रिक समस्या कायमस्वरूपी सोडवावी. केवळ आश्वासने न देता नागरिकांची गैरसोय थांबवण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.
-----------------