Vande Mataram in NMC : महापालिकेत आता हॅलो नाही, 'वंदे मातरम'

NMC News
NMC Newsesakal

नाशिक : राज्य शासनाने आता दूरध्वनी किंवा समोरासमोर बोलताना हॅलो, हाय ऐवजी वंदे मातरम म्हणण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या संदर्भातील आदेश महापालिकेला प्राप्त झाले असून, त्यानुसार विभागप्रमुखांना वंदे मातरम म्हणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (government suggestion to start conversation with Vande Mataram instead of Hello in NMC Nashik Latest Marathi News)

NMC News
Dasara Ravan Dahan 2022 : जय श्रीरामाच्या घोषात रावणदहन

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आजादी का अमृत महोत्सव साजरा होत आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचे औचित्य साधून शासकीय कार्यालयातील दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर अभयांगतांशी किंवा सहकारी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संभाषण करताना हॅलो ऐवजी वंदे मातरम या अभिवादनाने सुरवात करावी अशा सूचना शासनाच्या आहे.

शासकीय दूरध्वनी किंवा भ्रमणध्वनीवर संवाद साधताना वंदे मातरम म्हणणे आवश्यक तर आहेच त्याशिवाय खासगीरीत्यादेखील संवाद साधल्यास हॅलो ऐवजी वंदे मातरम म्हणावे अशा स्पष्ट सूचना आहेत. वंदे मातरम या अभिवादानात्मक शब्दाने सर्वांनी संभाषण तसेच सभेस सुरवात करण्यासाठी जाणीव जागृती व प्रचार प्रसिद्ध करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे.

NMC News
Dasara 2022 : बाजारपेठेचे सीमोल्लंघन; दसऱ्याचा मुहूर्त साधत ग्राहकांकडून खरेदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com