नामपूर- क्रीडा क्षेत्राला भारताला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये पदक मिळवणारे खेळाडू घडवण्यासाठी राज्यात ‘मिशन लक्ष्यवेध’ उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासाठी खासगी अकादमींचे सक्षमीकरण केले जाणार आहे. .राज्यातील खेळाडूंनी ऑलिंम्पिक सारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदके प्राप्त करण्यासाठी खेळाडूंसाठी अद्ययावत क्रीडा प्रशिक्षण यंत्रणा, क्रीडा विषयक पायाभुत सुविधा, क्रीडा वैद्यकशास्त्र, क्रीडा स्पर्धांचे आयोजन, खेळाडूंना पुरस्कार व प्रोत्साहन, खेळाडूंसाठी करिअर मार्गदर्शन व खेळाडूंच्या क्षमता विकासासाठी प्रशिक्षक व संस्थांना सहकार्यासह सर्व घटक विकसित करण्याच्या उद्देशाने शासनाने ''मिशन लक्ष्यवेध'' योजनेचा निर्णय घेतला. .मिशन लक्ष्यवेध’ अंतर्गत निवडलेल्या ॲथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बॉक्सिंग, हॉकी, लॉग टेनिस, रोईंग, शुटींग, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, कुस्ती आदी १२ क्रीडा प्रकारांच्या राज्यातील उत्तम खेळाडू निर्माण करणाऱ्या खासगी अकादमींना आर्थिक सहाय्य देऊन संस्थांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे. .या योजनेमुळे खासगी अकादमींना आर्थिक पाठबळ मिळणार असून खेळाडूंसाठी सुविधा निर्माण होणार आहे. पायाभुत क्रीडा सुविधा उभारणी, क्रीडा सुविधा उन्नत करणे, प्रशिक्षक मानधन, क्रीडा व प्रशिक्षण उपकरणे आदी बाबींवर खर्च करण्यासाठी देण्यात येणार आहे..असे होणार वर्गीकरणमिशन लक्ष्यवेध अंतर्गत खासगी अकादमीमधील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, सहाय्यक प्रशिक्षक, प्रशिक्षणासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा व त्यांचा स्तर, क्रीडा साहित्य व क्रीडा अकादमीच्या कामगिरींचे गुणांकन करण्यात येईल. ३५ ते ५० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था क वर्ग, ५१ ते ७५ गुण प्राप्त करणाऱ्या संस्था ब वर्ग व ७६ ते १०० गुण प्राप्त करणाऱ्या संस्था अ वर्ग अशा प्रकारे वर्गीकरण करण्यात येणार आहे..असे मिळणार अनुदान क वर्ग अकादमी वार्षिक १० लाख रुपये ब वर्ग अकादमी वार्षिक २० लाख रुपये अ वर्ग अकादमी वार्षिक ३० लाख रुपये .राज्यात ग्रामीण भागातून प्रत्येक तालुक्यात कोट्यवधी रुपयांच्या तालुका क्रीडा संकुलांची अवस्था भयावह आहे. क्रीडा संकुलाच्या निर्मितीत प्रचंड गैरव्यवहार झाल्याने ''पैसा गेला पाण्यात'' अशी अवस्था आहे. शासकीय अनुदानाच्या विनियोगातून योजनेची प्रभावी अंमलबावणी व्हायला हवी. - किरण वाघ, क्रीडाप्रेमी टेंभे वरचे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.