
नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक आणि अमरावती पदवीधर मतदारसंघाची व औरंगाबाद, नागपूर आणि कोकण शिक्षक मतदारसंघाची अशा एकूण ५ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत शिक्षकांच्या जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा हा प्रचंड मोठ्या प्रमाणात गाजत आहे. (graduate constituency election satyajeet tambe statement about old pension scheme nashik news)
असे असताना, जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारला भाग पाडणार असल्याचे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांनी सांगितले. नाशिक येथे प्रचारादरम्यान आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
सत्यजित तांबे यांचे वडील डॉ. सुधीर तांबे यांनी मागील तीन वेळा नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. आमदार पदाच्या कार्यकाळात त्यांनी १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या अंशतः: विनाअनुदानित व अंशतः: अनुदानित शिक्षकांना जुनी पेन्शन मिळवून देण्यासाठी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एका सम्यक समितीची स्थापना केली होती.
विविध शिक्षक संघटनांना विश्वासात घेऊन त्यांच्या मदतीने योग्य तो पाठपुरावा करत याबाबत निर्णय जारी करण्यासाठी शासनाला भाग पाडणार व डॉ. सुधीर तांबे यांच्या आमदार पदाच्या कार्यकाळात शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेणार असल्याचे सत्यजित तांबे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा : ....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
काही दिवसांपूर्वी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देताना शिक्षणाच्या, शिक्षकांच्या आणि वंचितांच्या प्रश्नावर आपण सोबत राहायला पाहिजे, असे आवाहन केले होते. राज्यभरात बहुचर्चित असलेली नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सोमवारी (ता. ३०) होणार आहे.
यासाठी अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांचा जोरदार प्रचार सुरु असून त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. प्रचारादरम्यान सत्यजित तांबे आपल्या मतदारांची गाठीभेटी घेत त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.