धुळे : टुडे पान २ साठी....
--
फोटो क्रमांक : 33864
धुळे : अवधान एमआयडीसी गोदामातील धान्य घोटाळ्याची एसआयटी चौकशी करावी, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार यांच्याकडे देताना सुनील बैसाणे.
--
धान्य घोटाळ्याची एसआयटी चौकशी करा
--
सुनील बैसाणेंची जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २९ : अवधान एमआयडीसीतील एक कोटी रुपयांहून अधिक स्वस्तधान्याच्या काळाबाजार विशेष तपास पथकामार्फत चौकशी करुन १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करावेत, या गैरव्यव्हारात सहभागी असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी स्थायी समतीचे माजी सभापती तथा भाजपाचे नगरसेवक सुनील बैसाणे यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांकडे केली.
श्री. बैसाणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की दुष्काळाच्या कठीण प्रसंगी केंद्र शासनाने जिल्ह्यातील गोरगरीब जनतेसाठी १२० मेट्रीक टन तांदूळ व १९६ मेट्रीक टन गहू असा धान्य साठा अवधान एमआयडीसीला दिला होता. हा साठा गोदामातून पुरवठा विभागाकडे हस्तांतरीत न करता परस्पर काळ्याबाजारात विकून एक कोटी १४ लाख ९३ हजारांचा अपहार केल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी केंद्रीय अधिकारी गुलाचंद देवांगन यांच्या फिर्यादीवरुन मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य संशयीत भांडार अधिक्षक निरज पाटील हा फरार आहे. याप्रकरणाचा तपास आर्थिक गुुन्हे शाखा करीत आहेत. जिल्ह्यात शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनता दुष्काळाने होरपळत असताना त्यांच्या हक्काच्या धान्यावर गैरव्यवहार होणे हे संतापजनक आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकारणाची एसआयटी मार्फत चौकशी करुन १५ दिवसात दोषारोपपत्र दाखल करावे, फरार मुख्य संशयीत निरज पाटीलला अटक करावी, त्याची व त्याच्या निकटवर्तीयांची मालमत्ता जप्त करावी. अवधान गोदामाचे गेल्या तीन वर्षाचे सर्व आवक-जावक रजिस्टर, स्टॉक ,वाहतुक बिलांचे त्रयस्त ऑडिट करावे, गैरव्यवहारात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांवर फौजदारी दाखल करावे. गोदामांना सीसीटीव्ही बायोमेट्रीक प्रणाली बसवावी. दोषींना मोक्का लावावा, अशा मागणी श्री. बैसाणे यांनी केल्या आहेत.