Gram Panchayat Election : दाभाडीत 67 टक्के मतदान; सरपंचपदाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

voting
votingesakal

दाभाडी (जि. नाशिक) : राजकीयदृष्ट्या जागृत असणाऱ्या येथील ग्रामपंचायतीची निवडणूक चुरशीची झाली. सरपंचपदासह अनेक जागांवर तिरंगी लढती झाल्या. १५ हजार ६०२ पैकी १० हजार ४५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. ६७.०२ टक्के मतदान झाले. सरपंचपदासाठी झालेल्या पंचरंगी लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. (Gram Panchayat Election 67 percent voting in Dabhadi Nashik News)

येथील १७ जागांसाठी व थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी उत्साहात मतदानाला सुरवात झाली. सर्वच उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांना ने-आण करण्यासाठी धावपळ करीत होते. वाड्यावस्ती व शेतमळ्यांमध्ये राहणाऱ्या मतदारांना मतदानासाठी सकाळपासूनच साकडे घातले जात होते. थेट सरपंचपदासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या गटाचे दोन प्रबळ उमेदवार आमने- सामने भिडले आहेत. तर युवानेते अद्वय हिरे यांच्या समर्थकांनीही कडवे आव्हान उभे केले आहे.

सरपंच पदासाठी प्रमोद निकम, शशिकांत निकम, संजय निकम, नानाभाऊ निकम व संयोग निकम यांच्यात पंचरंगी लढत झाली. उर्वरित सतरा जागांसाठी भुसे समर्थक गटाचे दोन पॅनल तर अद्वय हिरे गटाचे स्वतंत्र पॅनल रिंगणात आहे. तिरंगी लढतीत ५२ उमेदवार आपल नशीब आजमावत आहेत. मतदान केंद्रांना अपर पोलिस अधिक्षक अनिकेत भारती, उपअधिक्षक प्रदीपकुमार जाधव यांनी भेट दिली. छावणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

voting
Nashik News : त्र्यंबकेश्‍वरमध्ये अतिक्रमणांची डोकेदुखी; गल्ल्या अरुंद अन् पादचारी मार्ग झालेत बंद!

दाभाडीतील मतदान असे

वॉर्ड क्रमांक - एकूण मतदान - झालेले मतदान - टक्केवारी

१- २२७४ - १४९० - ६५.५२

२ - ३२९० - २३२९ - ७०.७९

३ - ३०४४ - २०१६ - ६६.२२

४ - २६६९ - १७६८ - ६६.२४

५ - २३६० - १५८७ - ६७.२४

६ - १९६५ - १२६७ - ६४.४७

--------------------------------

एकूण १५ हजार ६०२ पैकी १० हजार ४५७ मतदान झाले.

voting
Gram Panchayat Election : मालेगाव तालुक्यात उत्साहात मतदान!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com