Gram Panchayat Election : चांदोरी ग्रामपालिकेवर शिवसेनेची सत्ता! राष्ट्रवादीची सत्ता संपुष्टात

A procession of Vinayak Kharat, Sandeep Turle after winning the Sarpanch post candidature.
A procession of Vinayak Kharat, Sandeep Turle after winning the Sarpanch post candidature.esakal

चांदोरी (जि. नाशिक) : विधानसभेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आणि आगामी जिल्हा परिषद पंचायत समितीची सेमी फायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चांदोरी- नागापूर ग्रामपालिकेत शिवसेना पूरस्कृत श्री गणेश ग्रामविकास पॅनलने थेट सरपंचपदासह ११ सदस्यपदाच्या बहुमत प्राप्त केले तर गेल्या अनेक वर्षांची ग्रामपालिकेवर असलेल्या सिद्धार्थ वनारसे यांच्या गटाची सत्ता जात त्यांना फक्त ६ जागांवर विजय मिळवता आला. (Gram Panchayat Election Shiv Sena rule over Chandori Gram Panchayat nashik news)

राष्ट्रवादीच्या गटात सुरवातीपासून सुरू असलेला सरपंच उमेदवार निश्चितीचा घोळ, विनायक खरात यांना सरपंच पदाचा शब्द देत केलेला प्रवेश अन् टाळलेली उमेदवारी. त्यामुळे विनायक खरात यांच्या बद्दल निर्माण झालेली सहानुभूती यामुळे विजय अधिक सोपा झाला. त्यांनी तब्बल २ हजार ४०७ मतांनी संजय गायखे यांचा पराभव केला.

तालुक्यात असलेली परिवर्तनाची लाट चांदोरीमध्ये कायम राहत निर्विवाद बहुमत प्राप्त केले. तसेच राष्ट्रवादीच्या गटात वाढत चाललेला हस्तक्षेप, गेल्या पाच वर्षात झालेला एककल्ली कारभार, याचा फटकाही राष्ट्रवादी गटाच्या पराभवाला कारणीभूत ठरला.

"चांदोरी- नागापूरकरांनी टाकलेला विश्वास सर्वांना सोबत घेत सार्थ करून दाखवेल. गट, तट न करता सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य असेल."-विनायक खरात, नवनिर्वाचित थेट सरपंच.

A procession of Vinayak Kharat, Sandeep Turle after winning the Sarpanch post candidature.
Gram Panchayat Election Result: नांदगाव तालुक्यात प्रस्थापितांना ‘दे धक्का’!

विजयी उमेदवार

श्री विनायक खरात (श्री गणेश पॅनल)

प्रभाग एक

संगीता जाधव (श्री गणेश पॅनल)

अंजनाबाई पगारे (श्री गणेश पॅनल)

संदीप गडाख (श्री गणेश पॅनल)

प्रभाग दोन

अनिता टर्ले (श्री गणेश पॅनल)

मोनिका टर्ले (श्री गणेश पॅनल)

प्रकाश ढेमसे (श्री गणेश पॅनल)

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

A procession of Vinayak Kharat, Sandeep Turle after winning the Sarpanch post candidature.
Gram Panchayat Election : येवल्यात प्रस्थापितांना धक्का; नवोदित गावचे कारभारी!

प्रभाग ३

सोमनाथ बस्ते (श्री गणेश पॅनल)

सुवर्णा भोज (ग्रामविकास पॅनल)

प्रभाग ४

संजय शेळके (श्री गणेश पॅनल)

दिगंबर खालकर (श्री गणेश पॅनल)

माधुरी गडाख (श्री गणेश पॅनल)

प्रभाग ५

कमळाबाई डगळे (ग्रामविकास पॅनल)

छाया जाधव (बिनविरोध श्री गणेश ग्रामविकास पॅनल)

संतोष विसपुते (बिनविरोध ग्रामविकास पॅनल)

प्रभाग ६

अलका टर्ले (ग्रामविकास पॅनल)

सुनील गायखे (ग्रामविकास पॅनल)

रवींद्र बदादे (ग्रामविकास पॅनल)

A procession of Vinayak Kharat, Sandeep Turle after winning the Sarpanch post candidature.
Gram Panchayat Election : पिंपळगावात भास्करराव बनकरांची त्सुनामी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com