Gram Panchayat Election : मतदारांच्या कौलने प्रस्थापितांना धक्का! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election

Gram Panchayat Election : मतदारांच्या कौलने प्रस्थापितांना धक्का!

चांदवड (जि. नाशिक) : तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींच्या झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत नवीन युवा चेहऱ्यांनी बाजी मारली. काही ठिकाणी धक्कादायक निकाल लागले आहेत. भाजपने १९ सरपंच निवडून आल्याचा दावा केला आहे. तर काँग्रेसनेही १६ सरपंच आमचे निवडून आल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आठ सरपंच निवडून आल्याचा दावा कार्यकर्ते करीत आहेत. शिवसेना (ठाकरे गट) दोन जागा तर शिवसेना (शिंदे गट) एकही जागा मिळालेली नाही. (Gram Panchayat Election Voters shock established politicans at chandwad nashik news)

वडाळीभोईच्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख नितीन आहेर हे विजयी झाले आहेत. शिंगवे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पॅनल उभे न करता फक्त सरपंचपदासाठी निवडणूक लढवून भाजपचे आत्माराम खताळ यांनी विजयश्री खेचून आणत सर्वांनाच धक्का दिला. निमोण ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भाजपच्या डॉ. स्वाती देवरे या निवडून आल्या.

डोणगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत प्रस्थापितांना धक्का देत काँग्रेसचे गोकूळ वाघ थेट सरपंचपदी निवडून आले. आडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बाजार समितीचे माजी संचालक निवृत्ती घुले यांच्या पत्नी लताबाई घुले विजयी झाल्या. खडक ओझरच्या सरपंचपदी सागर पगार हे विजयी झाले आहेत. कुंदलगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राजेंद्र गिडगे यांच्याच गटाची सत्ता आली. काही गावात संपूर्ण पॅनल निवडून आले तर काही ठिकाणी मतदारांनी संमिश्र कौल दिला.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

हेही वाचा: Gram Panchayat Election : सौंदाणे सरपंचपदाची निवडणूक एकतर्फी; विरोधक नावालाच

सरपंचपदी विजयी उमेदवार असे

शेलू- अमोल जाधव, निंबाळे- रविना सोनवणे, चिंचोले- पवन जाधव, दहेगाव- कमळाबाई पगारे, कोकणखेडे- संदीप शिंदे, डोणगाव- गोकूळ वाघ, मालसाणे- पुष्पा बोरगुडे, वाद - प्रवीण आहेर, काजीसांगवी- कल्पना ठाकरे, साळसाणे- अनिल ठाकरे, शिंगवे- आत्माराम खताळ, खडकओझर- सागर पगार, सोनेसांगवी- अलका ठाकरे, कुंदलगाव- कविता मोरे, नारायणगाव- सुरेखा सोनवणे, मेसनखेडे खु - संतोष माळी, आडगाव- लताबाई घुले,

पाटे कोलटेक- रंगनाथ सूर्यवंशी, चिखलअंबे - शोभा लांडगे, भाटगाव- हिराबाई पगार, खेलदरी- मालती जाधव, रेडगाव खु - यादव गरुड, विटावे- साईनाथ कोल्हे, पुरी- रंजनाबाई पानसरे, गणुर- बाळू सोनवणे, तळवाडे- संदीप जाधव, बोराळे- बाकेराव जाधव, दुधखेडे- दिलीप हाडस, भुत्याणे- छाया चिंचोले, देवरगाव- ज्ञानेश्वर शिंदे, निमोण- स्वाती देवरे, दरेगाव- सरला पवार, दुगाव- संजय सोनवणे, तळेगाव रोही- भाऊसाहेब जिरे, वडाळीभोई- नितीन आहेर.

हेही वाचा: ZP Employees ID Cards : झेडपीच्या कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात नवीन ओळखपत्र!