Gram panchayat Election : येवला तालुक्यात शेती कामातून वेळ काढत मतदार राजा मतदानासाठी केंद्रावर!

voter
voteresakal

येवला (जि. नाशिक) : तालुक्यातील सात ग्रामपंचायतीसाठी सुमारे ९० टक्के मतदान झाले आहे. किरकोळ अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. सध्या शेती कामे वेगात सुरू असताना मोठ्या प्रमाणात मतदान झाले असल्याने गावोगावी ग्रामस्थांचा उत्साह दुनावलेला दिसला. (Gram Panchayat Election Yeola taluka 90 percent voting nashik news)

आज सर्वाधिक कमी मतदान कुसुर येथे (८६.५१ टक्के) झाले.येथे सरपंच पदासह सहा जागा बिनविरोध झाल्या आहेत तर केवळ चार जागांसाठी मतदान झाल्याने फारसा उत्साह दिसला नाही.सर्वात अधिक नायगव्हाण (९४.३० टक्के) मतदान झाले आहे.

कुसूर ग्रामपंचायतीच्या एका वॉर्डसाठी मतदान झाले. या वार्डात ५०४ मतदारांपैकी ४३६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ८६.५१ टक्के मतदान झाले. चांदगाव ग्रामपंचायतीच्या तीन वॉर्डसाठी ९३७ मतदारांपैकी ८३८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ८९.४३ टक्के मतदान झाले. एरंडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी ७७२ पैकी ७२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ९३.६५ टक्के मतदान झाले. नांदेसर ग्रामपंचायतीसाठी ६६८ मतदारांपैकी ६१७ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ९२.३७ टक्के मतदान झाले.

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

voter
Gram Panchayat Election : बागलाणला सरासरी 78 टक्के मतदान; थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी उत्साह

आडगाव चोथवा ग्रामपंचायतीसाठी १ हजार ५२५ मतदारांपैकी १ हजार ३८६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ९०.८९ टक्के मतदान झाले. कोटमगाव बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी ८३० मतदारांपैकी ७७६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ९३.४९ टक्के मतदान झाले. नायगव्हाण ग्रामपंचायतीसाठी ९१२ मतदारांपैकी ८६० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावल्याने ९४.३० टक्के मतदान झाले.येत्या मंगळवारी, (ता. २०) तहसील कार्यालय येथे मतमोजणीची होणार आहे अशी माहिती तहसीलदार प्रमोद हिले यांनी दिली.

एकूण ग्रामपंचायतचे मतदान पाहता सरासरी ९० टक्क्यांपर्यंत मतदानाचा आकडा गेला असून याचा फायदा कुणाला व तोटा कुणाला याचे अंदाज आडाखे बांधले जात आहे.मतदार राजा आता सत्ताधाऱ्यांना कौल देणार की नव्या उमेदवारांना संधी देणार हे आता मंगळवारी स्पष्ट होईल.

voter
Grapes News : द्राक्ष विक्रीसाठी बाजारात दाखल; चांगला भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com