बाणगाव बुद्रुक- ग्रामीण भागात रोहयो अंतर्गत होणाऱ्या वैयक्तिक लाभासह सार्वजनिक कामांचा लेखाजोखा व समन्वयक म्हणून काम पाहणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांचे मानधन प्रशासनाकडून सहा महिन्यांपासून देण्यात आलेले नाही. त्यामुळे राज्यात ग्रामरोजगार सेवकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कामावर आधारित अनिश्चित मानधनावर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांना आठ हजार रुपये मानधन देण्याची घोषणा शासनाकडून करण्यात आली. तसा शासन निर्णयही निघाला मात्र आज अखेर ग्रामरोजगार सेवकांना मानधनच मिळाले नाही.