Gram Sevak Transfer: ग्रामसेवकांच्या केवळ विनंती बदल्या होणार! प्रशासकीय बदल्या नसल्याने नाराजीचा सूर

Nashik News
Nashik Newsesakal

Gram Sevak Transfer : जिल्हा परिषदेतील सुरू झालेल्या कर्मचारी बदली प्रक्रियेत गुरुवारी (ता.२५) ग्रामपंचापयत विभागातील विविध संवर्गाची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत. तब्बल दोनशेहून अधिक ग्रामसेवक वर्षानुवर्ष एकाच गावात ठाण मांडून असल्याने त्यांच्या बदल्या होणे आवश्यक होते.

परंतू, शासन आदेशाप्रमाणे केवळ विनंती बदली राबविली जाणार असल्याचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सांगितले. प्रशासकीय बदल्या होणार नसल्याने ग्रामसेवकांमध्ये काहीसा नाराजीचा सूर आहे. (Gram Sevak will transfer only on request tone of displeasure due to lack of administrative transfers nashik news)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

होरायझन अकॅडमी येथे, सकाळी १० ते ४ या वेळात ग्रामपंचायत विभागातील ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) या तीन संवर्गातील बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. १८ मे २०२४ च्या शासन निर्णयामधील मार्गदर्शक सुचनेनूसार व शासन पत्र १८ मे २०२३ नूसार ग्रामसेवकांच्या ५ टक्के विनंती बदल्या केल्या जाणार आहे.

या आदेशाप्रमाणे तीनही संवर्ग मिळून एकूण ५८ बदल्या होण्याचा अंदाज आहे. ग्रामसेवक संवर्गात एकूण ९३४ ग्रामसेवक कार्यरत असून या संवर्गात एकूण ५६ बदल्या राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Nashik News
NMC News : शहरात 21 हजार व्यापारी रडारवर; एलबीटी निर्धारण करण्याच्या सूचना

याअंतर्गत आदिवासी क्षेत्रात २४ तर बिगर आदिवासी क्षेत्रात २३ बदल्या करण्यात येणार आहे. ग्राम विकास अधिकारी संवर्गात १८० अधिकारी कार्यरत असून शासन नियमाप्रमाणे एकूण ९ बदल्या करण्यात येणार आहे.

यामध्ये आदिवासी क्षेत्रात तीन बदल्या तर बिगर आदिवासी क्षेत्रात सहा बदल्या करण्यात येणार आहे. विस्तार अधिकारी संवर्गात ३८ अधिकारी कार्यरत असून ५ टक्के विनंती बदल्यांच्या अटीनूसार केवळ २ बदल्या करण्यात येणार आहे.

याअंतर्गत आदिवासी क्षेत्र एक आणि बिगर आदिवासी क्षेत्रात एक अशा एकूण दोन बदल्या होणार आहे.

Nashik News
Sakal Exclusive : पहिल्या दिवसापासुनच कमी होणार दप्तराचे ओझे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com