नातवाची आजीला आगळीवेगळी श्रद्धांजली; दशक्रियेला वाटले नारळाचे वृक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dashkriya

नातवाची आजीला आगळीवेगळी श्रद्धांजली; दशक्रियेला वाटले नारळाचे वृक्ष

येवला (जि. नाशिक) : पर्यावरण संवर्धनासाठी नेहमी पुढाकार घेऊन सामाजिक उपक्रम राबविणारे पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोरकडे यांनी शनिवारी (ता. २) आपल्या आजी अंबाबाई भोरकडे यांच्या दशक्रिया विधीली ५१ नारळाच्या वृक्षांचे वाटप करून आजींना आगळीवेगळी श्रद्धांजली अर्पण केली.
येवला ते अक्कलकोटपर्यत सायकलयात्रा काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्याचा उपक्रम भोरकडे दर वर्षी राबवितात.

नातवाची आजींना आगळीवेगळी श्रद्धांजली

भोरकडे यांच्या आजी अंबाबाई भीमाजी भोरकडे यांचे नुकतेच वयाच्या १०४ व्या वर्षी निधन झाले. त्यांचा दशक्रिया विधी शनिवारी भोरकडे वस्तीवर झाला. या वेळी आळंदी देवाची येथील बाळकृष्ण महाराज शिंदे यांचे कीर्तन झाले. दशक्रिया विधीला आलेल्या आळंदी येथील महाराजांना व पंचक्रोशीतील भजनी मंडळीला आजीची आठवण म्हणून विजय भोरकडे यांनी जय भवानी मित्रमंडळातर्फे ५१ नारळाच्या वृक्षांचे वाटप केले. समाजातील कुठलाही सुख-दुःखाचा प्रसंग असो या वेळी वृक्षाचे महत्त्व पटवून दायावे व जास्तीत जास्त वृक्षलागवड करावी, अशी विनंती मंडळाचे उपाध्यक्ष गणेश भोरकडे यांनी केली. मंडळाचे अध्यक्ष नवनाथ भोरकडे, उपाध्यक्ष गणेश भोरकडे, येवला पालिकेचे स्वच्छता निरीक्षक सागर झावरे, बाळासाहेब बनकर, किशोर खोकले, गणेश खोकले, किरण खोकले, विशाल खोकले, नवनाथ भोरकडे, नतीन कोकाटे, गोरक्षनाथ घोटेकर, विशाल शिंगाडे, गणेश सोमासे, अमोल महाले आदी उपस्थित होते.

हेही वाचा: बायकोला मोबाईलवर दिला घटस्फोट अन् भरपाई रक्कम 1 रुपया | Nashik

हेही वाचा: ऊसतोड कामगार माय-लेकीवर अत्याचार

Web Title: Grandson Donate Coconut Tree On His Grandmothers Dashkriya

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..