grapes
sakal
नाशिक: निर्यातक्षम द्राक्षांची हार्वेस्टिंग करताना निर्यातदार कंपन्यांना ‘ॲपेडा’कडून ठरवून दिलेल्या मानांकनाची पायमल्ली करीत असल्याचे समोर आले आहे. गुणवत्ता, आकार आणि बाजारपेठेनुसार द्यावयाच्या असलेल्या निकषांचे पालन न झाल्याने सर्वसामान्य शेतकरी तोट्यात जात आहे. त्यामुळे हार्वेस्टिंगच्या प्रक्रियेत सर्वांना समान न्याय देण्याची मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी सातत्याने करीत आहेत.