Grapes
sakal
लासलगाव: निसर्गाच्या लहरीपणाला, वाढत्या उत्पादन खर्चाला आणि अनिश्चित हवामानाला तोंड देत नाशिकच्या द्राक्षांनी अखेर जागतिक बाजारपेठेत आपली गोडी पुन्हा सिद्ध केली आहे. यंदाच्या हंगामातील पहिली ३० टन द्राक्षांची खेप नेदरलँड आणि जर्मनी या युरोपीय देशांसाठी रवाना झाली आहे.