Grapes Farming : द्राक्ष निर्यातीत यंदा घट

अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पन्नात झालेली घट आणि स्थानिक बाजारात प्रतिकिलो १०० रुपयांपेक्षा जास्त भाव किरण कवडे
Grapes Farming
Grapes Farmingsakal
Updated on

किरण कवडे : नाशिक- सप्टेंबर व ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे द्राक्ष उत्पन्नात झालेली घट आणि स्थानिक बाजारात प्रतिकिलो १०० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत असल्याने द्राक्ष निर्यातीत यंदा काही प्रमाणात घट झाली आहे. मार्च २०२४ अखेर युरोप व युनायटेड किंग्डम येथील देशांना पाच हजार ८९६ कंटनेर निर्यात झाली होती. या तुलनेत यंदा ७ मार्चपर्यंत चार हजार २३५ कंटेनर रवाना झाले आहेत. येत्या पंधरा दिवसांत ही तूट भरून निघण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com