लासलगाव- यंदाचा द्राक्ष हंगाम संपुष्टात येत असताना निर्यातीच्या आकडेवारीने काहीसे चिंता वाढविणारे चित्र समोर आले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५६६ टनांनी द्राक्ष निर्यात कमी झाली असून, परिणामी देशाला परकीय चलनाचा मोठा फटका बसला आहे..गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये एकूण १, ५६, ९०५ टन द्राक्षे ११ हजार २७३ कंटेनरद्वारे समुद्रमार्गे युरोपातील प्रमुख देशांसह रशिया, युक्रेन, फ्रान्स, बेल्जियम, इंग्लंड, नार्वे, नेदरलॅंड, स्वीडन आणि स्पेनमध्ये निर्यात झाली होती. मात्र यंदा ३० एप्रिल २०२५ पर्यंत केवळ १,५६,३५९ टन द्राक्षांची ११ हजार ५९ कंटेनरद्वारे निर्यात झाली. त्यामुळे यंदा निर्यातीत ५६६ टनांची घट झाली आहे..ही घट केवळ आकड्यापुरती मर्यादित नसून यामुळे देशाला परकीय चलनाच्या स्वरूपात मोठा तोटा झाला आहे. द्राक्षांना सरासरी १.२ डॉलर प्रतिकिलोचा दर धरल्यास, ५६६ टन म्हणजे ५,६६,००० किलो द्राक्षांची कमी निर्यात ही सुमारे ६,७९,२०० डॉलर (अंदाजे ५.६ कोटी रुपये) इतक्या परकीय चलनाच्या नुकसानास कारणीभूत ठरली आहे..द्राक्ष निर्यातीमध्ये नाशिक जिल्ह्याचा ९१ टक्के वाटा असून, ही घट विशेषतः नाशिकमधील उत्पादकांसाठी चिंतेची बाब होती. मात्र, यंदा देशांतर्गत बाजारपेठेत द्राक्षांना ५० ते १४० रुपये प्रतिकिलो असा चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. .राज्यातील अनेक द्राक्ष उत्पादक शेतकरी देशांतर्गत विक्रीकडे वळले असून, निर्यातीत झालेल्या नुकसानीचा काहीअंशी भरावा त्यांना स्थानिक बाजारातून मिळाला आहे. त्यामुळे यंदा परकीय चलनाचे नुकसान झाले असले तरी शेतकरी समाधानात आहेत, असे चित्र आहे..५६६ टनांची घट दिसत असली तरी, याचा थेट परिणाम भारताच्या फळ निर्यातीच्या विश्वासार्हतेवर होऊ शकतो. यासाठी सरकारने साठवणूक व वाहतूक सवलती द्यायला हव्यात.-सचिन होळकर, कृषी अभ्यासक, लासलगाव.द्राक्षे निर्यातीत झालेली घट ही आंतरराष्ट्रीय बाजारातील स्पर्धा, चलनवाढ आणि वाहतूक खर्चामुळे झाली असण्याची शक्यता आहे. मात्र स्थानिक बाजाराने यंदा शेतकऱ्यांना चांगला आधार दिला आहे.-सुरेश कळमकर, कृषिभूषण, मोहाडी.Relationship Advice By Celebrity Nutritionist: फक्त खाण्यातलाच नाही तर नात्यातलाही गोडवा वाढवण्याचे सल्ले देतात 'सेलिब्रिटी पोषणतज्ञ रुजुता दिवेकर' .आम्ही यंदा मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत विक्री केली. निर्यात थोडी कमी झाली असली तरी स्थानिक बाजारात चांगला दर मिळाल्यामुळे समाधान आहे.-अॅड. रामनाथ शिंदे, द्राक्ष उत्पादक, उगाव शिवडी .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.