Grape farming
sakal
लासलगाव: द्राक्षांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्हातील द्राक्ष उत्पादक शेतकरी सध्या गंभीर संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून जाणवणारी तीव्र थंडी आणि सततचे ढगाळ वातावरण याचा थेट परिणाम द्राक्ष बागांवर होत असून, उत्पादन व दर्जा दोन्ही धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली आहे.