Indian Grapes in Global Market: कसबे-सुकेणे- आर्थिक फटका बसलेल्या द्राक्ष बागायतदारांसाठी या वर्षी वरदान ठरले असून, सुरुवातीपासूनच द्राक्ष पिकाला उत्तम दर मिळत असल्याने द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे..गेल्या पाच ते सहा वर्षांपासून द्राक्षबागांची स्थिती चिंताजनक होती. या वर्षी प्रथमच देशांतर्गत बाजारपेठेबरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्ष पिकाला मोठी मागणी असून, शेतकऱ्यांच्या हाती चार पैसे मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे..द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांनी नवीन जातीच्या द्राक्षबागा वाढविण्याकडे आपला कल वाढविला आहे. अनेक शेतकरी निर्यातक्षम व्यापाऱ्यांची जोडले गेले असून, करारानुसार लावलेल्या द्राक्षबागा व त्यानुसार होणारी निर्यात शेतकऱ्यांसाठी वरदान ठरवू पाहत आहे. अनेक नवीन द्राक्षाच्या जाती उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळेही द्राक्षांना चांगले दर मिळत आहे..शंभर ते १३० रुपये प्रतिकिलो प्रमाणे दर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळत असून, निर्यातक्षम द्राक्षबागा मिळविण्यासाठी व्यापाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या वर्षी द्राक्ष पिकांचे प्रमाणही कमी असल्याने व मागणी मोठी असल्याने दरात मोठी वाढ असल्याने हे वर्ष शेतकऱ्यांसाठी वरदानच ठरू पाहत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.