पिंपळगांव बसवंत: द्राक्षांच्या बाजारभावाला सोन्यासारखी ऐतिहासीक झळाळी मिळत असताना चोरट्यांची मात्र त्यावर वक्रदृष्टी झालेली दिसते. शिरवाडे वणी, पालखेडच्या द्राक्षशेती शिवारात चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घातला आहे. मध्यरात्री अंधाराचा फायदा घेऊन काही चोरटे बागांमध्ये द्राक्षघडाची चोरी करत आहे. शिरवाडे वणी (ता. निफाड) येथे रविवारी मध्यरात्री द्राक्षचोरी करणाऱ्याला पकडुन शेतकऱ्यांनी चांगलाच चोप दिला.