Grape Market Price : द्राक्षांची शंभरी पार!

बाजारात द्राक्षांना शंभर रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळत असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण
Grape Market Price
Grape Market Pricesakal
Updated on

नाशिक- द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या स्थानिक बाजारात द्राक्षांना शंभर रुपयांपेक्षा अधिकचा भाव मिळत असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अवकाळीमुळे उत्पादन कमी झालेले असले तरी उष्णतेमुळे द्राक्ष मण्यांमध्ये उतरलेला गोडवा हा ग्राहकांच्या पसंतीस उतरल्याने स्थानिक बाजारातच द्राक्षांची मागणी वाढलेली दिसते. त्यामुळे केवळ निर्यातीवर अवलंबून राहण्याऐवजी स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने यंदाचा हंगाम मार्चअखेर संपण्याची शक्यता उत्पादकांनी वर्तवली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com