Nashik News : माळमाथा परिसरातील खडी वाहतूक ठरतेय धोकादायक! खडीवर घसरून मिळतेय अपघातांना निमंत्रण

Gravel leading to accidents on the state highway in Chikhall Ohol Shiwar in Gigaon Phata.
Gravel leading to accidents on the state highway in Chikhall Ohol Shiwar in Gigaon Phata.esakal

Nashik News : माळमाथा भागातील चिखल ओहोळ शिवारात मालेगाव -चाळीसगाव मार्गावर या परिसरातील खडी क्रशरची संख्या वाढली आहे. या खडी क्रशरमधून शहरात व परिसरातील भागात खडीचा पुरवठा करण्यात येतो.

खडी पुरवठा करणाऱ्या डंपर व ट्रॅक्टर मधून बरेचदा वरचेवर खडी रस्त्यावर पडत असल्याने सपाट व गुळगुळीत डांबरी रस्त्यावर अनेकदा दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे ही खडी वाहतूक आता सर्वसामान्यांसाठी धोकादायक बनत चालली आहे. (Gravel traffic in Malmatha area becoming dangerous Slipping on rocks invites accidents Nashik News)

मालेगाव तालुक्यातील माळमाथा हा अवर्षणप्रवण भाग असून मुरमाड व खडकाळ जमीन असल्याने अनेक शेतकऱ्यांनी ती जमीन खडी क्रशर चालकांना दिली आहे. परिणामी मोठ्या प्रमाणावर खडी ही चाळीसगाव फाटा व परिसरातील विविध खडी क्रशर कडून उपलब्ध होत आहे.

मात्र या खडीचे वाहतूक करताना वाहनचालक यांच्याकडून आवश्‍यक ती काळजी घेतली जात नसल्याचे आता समोर आलेले आहे. ज्या मार्गावरून ही खडीची वाहतूक केली जात आहे. त्यामार्गावर सर्वत्र रस्त्यावर खडी वाहनातून मोठ्या प्रमाणात पडत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Gravel leading to accidents on the state highway in Chikhall Ohol Shiwar in Gigaon Phata.
Nashik News : कडवा पाटात ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचा मृत्यू

यामुळे दुचाकी व हलकी वाहनांना थेट अपघाताचे निमंत्रण मिळू लागले आहे. त्यामुळे खडी क्रशर चालक व मालकांनी या प्रकाराकडे लक्ष ठेवून सदर प्रकार थांबवावा अशी मागणी माळमाथा भागातील नागरिकांनी केली आहे.

"गेल्या अनेक दिवसापासून चिखलओहोळ शिवारात अनेक खडी क्रशर सुरु आहेत. खडीने भरगच्च भरलेले डंपर चिखलओहोळ रस्त्यावरून ज्यावेळेस चाळीसगाव - मालेगाव रस्त्यावर येतात त्यावेळेस भरगच्च भरलेल्या गाडीमधून खडी रस्त्यावर इतरत्र पडते. गेल्या अनेक दिवसापासून अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. परिणामी लोकांना मोठ्या प्रमाणात दुखापत झालेली आहे. परिसरात धुळीचे साम्राज्य पसरलेले असून त्याचा परिणाम पिकावर तसेच आजूबाजूच्या वस्तीवर होत आहे. गौण खनिज उत्खनन विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करावी." - समाधान पवार, ग्रामपंचायत सदस्य, गिगाव.

Gravel leading to accidents on the state highway in Chikhall Ohol Shiwar in Gigaon Phata.
Nashik: नांदूरमधमेश्‍वर धरणाचा कोंडला श्‍वास!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com