District Road Projectssakal
नाशिक
Nashik News : जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना ‘ग्रीन सिग्नल’
District Road Projects : जिल्हास्तरीय महामार्ग विकास समितीने या कामांना मान्यता दिली. त्यामुळे रस्त्यांच्या कामांना गती मिळणार आहे.
नाशिक- सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे जिल्ह्यात दोन हजार २७६ कोटी रुपये खर्च करून विविध रस्ते उभारण्यात येणार आहेत. जिल्हास्तरीय महामार्ग विकास समितीने मंगळवारी (ता. २९) या कामांना मान्यता दिली. त्यामुळे रस्त्यांच्या कामांना गती मिळणार आहे.
