दुष्काळात भुजल पातळीचे फेरसर्वेक्षण

दुष्काळात भुजल पातळीचे फेरसर्वेक्षण
Published on: 
जिल्ह्यातील भूजल पातळीचे फेरसर्वेक्षण जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबरनंतर ऑक्टोबरची पातळीही मोजणार सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता.३ : जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधे दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता टंचाई कृती आराखडा मंजूर करण्यापूर्वी भूजल सर्वेक्षण विभागातर्फे भूजल पातळीचे फेरसर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यानंतर टंचाई कृती आराखड्यात बदल करण्यात येतील. भूजल सर्वेक्षण आणि मापन विभाग प्रत्येक वर्षी जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबरमधे भूजल पातळी नोंदविते. त्यांच्या अहवालाच्या आधारे जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग टंचाईग्रस्त गावांमधील पाण्याच्या उपाय योजना सूचविते. टंचाई कृती आराखड्याच्या माध्यमातून या उपाय योजना केल्या जातात. जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून बहुतांश पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झालेल्या आहेत. मात्र, पाण्याचा उद्भव असलेल्या विहिरींमधेच पाणी नसल्यामुळे काही योजना पूर्ण होवूनही गावांना पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यंदा भीषण दुष्काळाचे सावट असून पावसाळ्यात फक्त जून व जुलैमध्ये पाऊस पडला. त्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप हंगामातील पीके जागेवरच करपली. परिणामी, राज्य शासनाने जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधे दुष्काळ जाहीर करुन येथील शेतकऱ्यांना ५ हजारांचे अग्रिम देण्याची घोषणा केली. दिवाळीनंतर टंचाईग्रस्त गावांमध्ये गुरांना चारा व पाण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सप्टेंबर महिन्यातील अहवालाच्या आधारे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाई आराखडा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. त्याला अद्याप राज्य शासनाने अंतिम मंजूरी दिलेली नाही. तत्पूर्वी, भूजल सर्वेक्षण विभागामार्फत ऑक्टोबरमध्ये पुन्हा पातळी तपासण्याचे आदेश दिले असून येत्या शुक्रवारपर्यंत हा अहवाल पूर्ण होणे अपेक्षित आहे. … विंधन विहिरींना बंदी कायम जिल्ह्याची भूजल पातळी दिवसेंदिवस खालावत असल्याने काही तालुक्यांमध्ये नवीन सिंचन विहिरी खोदण्यास बंदी घालण्यात आली आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने २०२२-२३ मध्ये तयार केलेल्या अहवालानुसार ७७६ गावांमधे नवीन विहीर खोदण्यास बंदी आहे. येथील भूजल पातळीत १०० टक्क्यांपेक्षा खालावल्याने या गावांना विहीर खोदण्यास बंदी असून शासकीय विहीर किंवा बोअरवेल घेण्यासाठीही ६० मिटरची मर्यादा घालून दिली आहे. … चारवेळा सर्वे वर्षातून चारवेळा भूजल पातळीचे मूल्यांकन केले जाते. जानेवारीपर्यंत खरीप हंगाम संपलेला असतो. त्यानंतर मार्चपर्यंत पिकांना सिंचनाद्वारे पाणी देण्यास सुरुवात होते आणि जमिनीतून पाणी उपसा झाल्यामुळे खालावलेली पातळी निदर्शनास येते. उन्हाळ्यात भूजल पातळी व अधिग्रहीत विहिरींची पातळी करण्यास मदत होते. त्यामुळे टंचाई कृती आराखडा सप्टेंबरच्या अहवालाच्या आधारे तयार केला जातो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.