
Nashik News : स्वामिनारायण मंदिरात समूह महाआरती
पंचवटी (जि. नाशिक) : स्वामिनारायण मंदिर (बी ए पी एस) प्रमुखस्वामीजी महाराज यांच्या जन्म शताब्दी दिनानिमित्त समूह महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. (Group Maha Aarti at Swaminarayan Temple Nashik Latest Marathi news)
First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने
प्रमुख स्वामी महाराज (७ डिसेंबर १९२१ - १३ ऑगस्ट २०१६) हे हिंदू धर्माचे महान संत होते. त्यांचे मूळ नाव शांतिलाल पटेल होते. त्यांना नारायण स्वरूपदास स्वामी या नावाने दीक्षा दिली. ते बोच संन्यासी अक्षर पुरुषोत्तम स्वामिनारायण (बीएपीएस) संस्थेचे प्रमुख अध्यक्ष होते. महाआरती प्रसंगी प्रमुखस्वामी महाराजांची स्मृतींना उजाळा देताना भाविक भावविवश झाले.
भूमीवरील प्रसंगांना उजाळा दिला. जन्म शताब्दीच्या निमित्ताने (ता. ४) रांगोळी स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाच हजार लोकांनी समूह आरतीमध्ये भाग घेतला होता. महाव्रत स्वामी, दिव्य नयन स्वामी, आत्मभूषण स्वामी, आनंद विहारी स्वामी, देव वल्लभ स्वामी, अभय जीवन स्वामी आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा: Nashik News : शौचालय नसल्याने सदस्यांना गमवावे लागले पद; खोटी माहिती देणे पडले महागात