Talathi, Forest Guard Recruitment: तलाठी, वनरक्षक भरतीसाठी 4 पासून मार्गदर्शन शिबिर

Guidance Camp File Photo
Guidance Camp File Photoesakal

Talathi, Forest Guard Recruitment : राज्‍य शासनातर्फे राबविल्‍या जात असलेल्‍या तलाठी व वनरक्षक भरती परीक्षेसंदर्भात उमेदवारांना मार्गदर्शनासाठी तीनदिवसीय मोफत मार्गदर्शन शिबिर होणार आहे.

४ ऑगस्‍टपासून मेरी-रासबिहारी लिंक रोडवरील औदुंबर लॉन्स येथे सकाळी अकरा ते सायंकाळी पाचदरम्‍यान कार्यशाळा पार पडणार असल्‍याची माहिती युनिव्हर्सल फाउंडेशनचे संचालक प्रा. राम खैरनार व महापालिकेतील माजी गटनेता जगदीश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Guidance Camp for Talathi Forest Guard Recruitment from 4 august nashik)

प्रा. खैरनार म्‍हणाले, की राज्‍य शासनातर्फे विविध विभागांतर्गत भरतीप्रक्रिया राबविली जाते आहे. तलाठी पदासाठी चार हजार ६४४ जागा आणि वनरक्षक पदासाठी दोन हजार १३८, अशा सुमारे सहा हजार ७०० जागांवर भरती होते आहे.

दोन्ही परीक्षांचे स्वरूप उमेदवारांना लक्षात यावे, परीक्षेबाबत सविस्‍तर माहिती व्‍हावी, या उद्देशाने युनिव्हर्सल फाउंडेशन व महापालिकेचे माजी गटनेता जगदीश पाटील यांच्यातर्फे हा उपक्रम राबवत असल्‍याचे नमूद केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Guidance Camp File Photo
Modi Awas Gharkul Yojana: राज्यात इतर मागास प्रवर्गास मोदी आवास घरकुल योजना! 10 लाख घरांसाठी 12 हजार कोटी

श्री. पाटील म्‍हणाले, की ४ ते ६ ऑगस्टदरम्यान मोफत मार्गदर्शन शिबिर पार पडेल. या वेळी स्पर्धा परीक्षेतील तज्‍ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. परीक्षेची रचना, तसेच अभ्यासक्रम आदींसंदर्भात मार्गदर्शन केले जाणार आहे.

ऑनलाइन परीक्षा होणार असल्‍याने विद्यार्थ्यांकडून दहा सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेतल्या जाणार आहेत. कार्यशाळेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. राम खैरनार, प्रा. दीपक वडजे, प्रा. राहुल शिंदे, प्रा. गिरीश कराड मार्गदर्शन करतील.

Guidance Camp File Photo
Nashik News: अन्यथा युरियाची विक्री बंद; ‘कृषी’कडून कार्यवाहीची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com