...मग गुजरातच्या मोटेरा स्टेडियमला ‘सरदार वल्लभभाई पटेल’ नाव का नाही? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

chhagan bhubal

मोटेरा स्टेडियमलाही वल्लभभाई पटेलांचे नाव हवे - छगन भुजबळ

येवला (जि.नाशिक) : काँग्रेसने (congress) जी काही नावे दिली असतील, ती बदलण्याचा सपाटा लावला असून, राजीव गांधी (rajiv gandhi) यांनी जे बलिदान दिले आहे, ते विसारण्यासारखे नाही. जर नाव बदलायचे होते, तर गुजरातमधील मोटेरा स्टेडियमला (motera stadium) ‘सरदार वल्लभभाई पटेल’ हे नाव का दिले नाही. तेथे स्वतःचे नाव का, असा प्रश्‍न पालकमंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी उपस्थित केला.

मोटेरा स्टेडियमला ‘सरदार वल्लभभाई पटेल’ हे नाव का नाही?

भुजबळ यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. ६) पालिका क्षेत्रात ११ कोटी ६६ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण झाले. त्या वेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले, की नव्याने मंजूर करण्यात आलेली विकासकामे उत्कृष्ट दर्जाची असावीत, याची काळजी अधिकारी वर्गाने घ्यावी. लसीकरण झाल्यानंतरही काही प्रमाणात कोरोना होत आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्यांनी गाफील न राहता कोरोना नियमांचे काटेकोर पालन करून मास्कचा नियमित वापर करावा, असे आवाहनही त्यांनी केले. पालिका हद्दीत शहरातील अंबिया शाह कॉलनी शादीखाना हॉल, समदनगर भागात वाचनालय, प्राथमिक सोयी-सुविधा योजनेंतर्गत विकासकामांचे भूमिपूजन, वेद कॉलनीत संरक्षक भितींसह आधुनिक वाचनालय करणे, वेद कॉलनी भागातील रस्ते काँक्रिटीकरण, हायवे ते दिलीप केदार रस्ता काँक्रिटीकरण, कलावती आई मंदिर ते सोपान व्यवहारे यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण, माया परदेशी यांच्या घरापासून ते गोरख सोनवणे यांच्या घरापर्यंत काँक्रिटीकरण, दिवटे पैठणी ते मारुती क्षीरसागर यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रिटीकरण आदी कामांचे भूमिपूजन भुजबळ यांच्या हस्ते झाले.

माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राधाकिसन सोनवणे, नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर, उपनगराध्यक्ष सूरज पटणी, अरुण थोरात, बांधकाम सभापती निसार शेख, बाजार समिती प्रशासक वसंत पवार, मकरंद सोनवणे, नवनाथ काळे, ज्ञानेश्‍वर शेवाळे, सचिन कळमकर, हुसेन शेख, शहराध्यक्ष दीपक लोणारी, प्रवीण बनकर, निसार शेख, अकबर शेख, मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, बांधकाम अभियंता जनार्दन फुलारी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. बाळासाहेब लोखंडे यांनी नियोजन केले. येवला शहर सदैव स्वच्छ, सुंदर राहील यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा: पाकिस्तानचा कांदा श्रीलंकामध्ये भारतापेक्षा स्वस्त!

हेही वाचा: निर्बंध शिथिल होताच नाशिककरांसाठी चिंता वाढविणारी बातमी!