

Thousands of Sai Devotees from Gujarat Head Towards Shirdi via Saptashrung Gad
sakal
वणी (नाशिक) : 'मेरे घर के आगे साईनाथ तेरा मंदिर बन जाये...', शिर्डीवाले साईबाबा...' अशा भक्तिगीतांचा निनाद आणि 'साई राम... साई राम...'च्या अखंड जयघोषाने वणी-सप्तशृंगगड परिसर साईमय झाला आहे. गुजरातमधील हजारो साईभक्तांच्या पालख्या आणि पदयात्रा सप्तशृंगगडाचे दर्शन घेऊन शिर्डीच्या दिशेने मार्गस्थ होत आहे. भक्तीचा प्रवास, सेवेचा आनंद आणि साईनामाची ऊर्जा... अशा त्रिवेणी संगमाने वणी परिसर सध्या साईमय झाला असून वणी परिसरात भक्तीचा अनोखा सोहळा अनुभवायला मिळत आहे.